Ratnagiri News – जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उद्या मतदान; 82 मतदान केंद्रे सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य निवडणूक आयोगाकडील आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार देवगड तालुक्यातील ८२ मतदान केंद्रांवर शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी स.७.३० ते ५.३० या वेळात मतदान होणार आहे. देवगड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक विभाग ३ व ८ पंचायत समिती निर्वाचण गण आहेत. मुळ ८२ मतदान केंद्रे आहेत एकूण ३ जि प व ८ प. स. जागाकरिता निवडणूक होत असून एकूण मतदार संख्या ५३ हजार १४२ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार संख्या २६ हजार ४६५ व महिला मतदार संख्या २६ हजार ६७७ मतदार आहेत.

देवगड तहसीलदार कार्यालय येथे सकाळपासून मतदान केंद्रावरील साहित्य ताब्यात घेतले. त्यानंतर सकाळी ११ वाजता मतदान केंद्रावरील सर्व पथके अधिग्रहण केलेल्या एस.टी. बसेस,व अन्य खाजगी वाहनांमधून साहीत्य घेवून मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत. मतदान पथकामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, इतर मतदान अधिकारी १ व २ शिपाई, पोलीस कर्मचारी असे असणार आहेत.८२ मतदान केंद्रांकरिता एकूण ५७४कर्मचारी कार्यरत असणार आहेत.