
बॉलिवूडची पहिली आयटम गर्ल आणि ड्रामा क्विन राखी सावंत बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री करायला सज्ज झाली असल्याचे समजते. येत्या आठवड्यात राखी पाहुणी म्हणून बिग बॉसच्या घरात येणार असून ती घरातल्या सदस्यांच्या तोंडचं पाणी पळवणार आहे. राजश्री मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.
राखी सावंत बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार असे भाकीत याआधीच स्पर्धक सोनाली राऊतने केले होते. दरम्यान बिग बॉस सुरू झाल्यापासून राखी सावंत येणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. तन्वी कोलते, अनुश्री माने व रुचिता जामदार या तिघींचा खेळ पाहून चाहत्यांनी तर राखी सावंतला आणा तिच या तिघींना सळो की पळो करू शकते अशी मागणी केली होती.
दरम्यान आता या आठवड्यात राखी सावंत घरात एन्ट्री करणार असल्याचे समजते. ती घरात स्पर्धक म्हणून येणार नसून ती पाहुणी म्हणून दोन आठवडे घरात राहणार आहे. आता राखी सावंत बिग बॉसच्या घरात काय करणार याची उत्सुकतता प्रेक्षकांना लागली आहे.
बिग बॉस मराठीच्या चौथ्या व पाचव्या सिझनमध्ये देखील आली होती. चौथ्या सिझनमध्ये ती स्पर्धक म्हणून आलेली तर पाचव्या सिझनमध्ये ती पाहुणी म्हणून आली होती.


























































