
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम 1 जानेवारी 2026 या दिनांकावर आधारित असेल. एकत्रित प्रारूप मतदार यादी 9 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अंतिम मतदार यादी 10 मार्च रोजी प्रसिद्ध होईल.





























































