हिजबुल्लाह संघटनेत फेरबदल, वफीकला हटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लेबनानची संघटना हिजबुल्लाहने संघटनेत फेरबदल केले असून वरिष्ठ सुरक्षा अधिकारी वफीक सफाला पदावरून हटवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सफाने स्वतः पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर नेतृत्वाने सफाचा राजीनामा स्वीकारला. सफा हा अनेक दशकापासून संघटनेत संपर्क आणि समन्वयकचा प्रमुख होता. तसेच लेबनानच्या सुरक्षा एजन्सीसोबत काम पाहत होता. वफीक सफाच्या जागी आता हुसैन अब्दुल्लाहकडे जबाबदारी सोपवली आहे. हुसैन अब्दुल्लाह आतापर्यंत चर्चेपासून दूर राहिला आहे. इस्रायलसोबत 14 महिने युद्ध केल्यानंतर हिजबुल्लाह संघटनेत बदल करण्यात आला आहे. 2019 मध्ये अमेरिकेने हिजबुल्लाह संघटनेवर बंदी घातली होती.