रितू तावडे मुळच्या काँग्रेसच्याच! दुसऱ्या टर्ममध्ये सर्वोच्च पदावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या 78 व्या महापौर ठरलेल्या रितू तावडे मूळच्या काँग्रेसच्याच कार्यकर्त्या आहेत. 2012 पर्यंत त्या काँग्रेसमध्ये विविध पदावर कार्यरत होत्या. मात्र 2012 मध्ये त्या भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा नगसेविका म्हणून निवडून आल्या. पालिकेच्या शिक्षण समितीसह अनेक पदांवर त्यांनी यशस्वीरीत्या काम केले आहे.

महापौर रितू तावडे प्रभाग क्र. 127 मधून निवडणूक लढून त्या जिंकून आल्या आहे. त्यांनी मुंबई उपनगर स्थापत्य समिती उपाध्यक्षा म्हणूनही काम केले आहे. त्यांनी भाजपमध्ये जिल्हा अध्यक्षासह अनेक पदांवर त्यांनी काम केले आहे. हिंदू मराठा असलेल्या रितू तावडे कणकवली, खारेपाटण, पुंकवन येथील आहेत. 2017 च्या निवडणुकीत त्या पराजित झाल्या. मात्र त्यांनी आपले काम सुरूच ठेवत आता प्रभाग क्र. 132 मधून विजय मिळवला.

सेवक म्हणून काम करणार

मुंबईच्या महापौर पदावर बसल्यानंतर मुंबई महापालिकेचे ट्रस्टी आणि मुंबईकरांचे सेवक म्हणून काम करणार आहोत. मुंबईकरांच्या अपेक्षा जास्तीत जास्त पूर्ण करणार. मुंबईकरांना खड्डे मुक्त रस्ते देणार, दर्जेदार सुविधा देणार असून बांगलादेशी घुसखोरांना मुंबईतून  हद्दपार करण्यासाठी काम करणार असल्याचे त्या म्हणाल्या.