Short news – बांगलादेशात हिंदू नेत्याचा तुरुंगात मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ढाका – बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरोधात हिंसाचार सुरूच असून आता एका हिंदू नेत्याचा तुरुंगातच संशयास्पद मृत्यू झाला आहे. रमेशचंद्र सेन असे त्याचे नाव आहे. सेन हे बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते दीनाझपूर तुरुंगात होते. सेन यांच्या मृत्यूवरून बांगलादेशात मोठा वाद निर्माण झाला आहे.

नोबेल विजेत्या मोहम्मदी यांना तुरुंगावास

तेहराण – शांततेचे नोबेल मिळवणाऱया मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना इराणच्या न्यायालयाने सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोप मोहम्मदी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना देश सोडून जाण्यासही मनाई केली आहे.

एपस्टिनकडून हजारो महिलांचे शोषण

वॉशिंग्टन – अमेरिकेसह जगाला हादरवणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या सेक्स स्कँडलचा सूत्रधार व कुख्यात मानवी तस्कर जेफ्री एपस्टिन याने एक हजारहून अधिक महिलांचे शोषण केल्याचे समोर आले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टिनच्या काळ्या कारनाम्याचे पुरावे असलेली 35 लाखांची एपस्टिन फाइल खुली करणे सुरू केले आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे.