
बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱया तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये 860 जागांसाठी भरती केली जात आहे. अर्ज करण्यासाठी 19 फेब्रुवारी 2026 ही अखेरची तारीख आहे. सविस्तर माहिती https://bankofbaroda.bank.in यावर दिली आहे.
हिंदुस्थानी नौदलात 260 ऑफिसर पदांची भरती
हिंदुस्थानी नौदलामध्ये एसएससी ऑफिसर पदांच्या एपूण 260 जागांसाठी भरती केली जात आहे. या सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2026 आहे. परीक्षा नंतर कळवली जाणार आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती https://indiannavy.gov.in या अधिपृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.
दोन जपानी पर्यटक जयपूरमधून बेपत्ता
हिंदुस्थानात फिरायला आलेले दोन जपानी पर्यटक हे राजस्थानच्या जयपूरमधून बेपत्ता झाले आहेत. टॅक्सी ड्रायव्हरला जेवण करून येतो असे सांगून ते दोघे मॅकडोनाल्ड्स रेस्टॉरंटमध्ये गेले होते, पण परत आले नाहीत. त्यांचे सामान टॅक्सीमध्येच होते. बराच वेळ वाट पाहूनही परत न आल्याने ड्रायव्हरने अशोकनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. हे दोन्ही जपानी पर्यटक तीन दिवसांपूर्वीच हिंदुस्थानात आले होते. पोलीस या पर्यटकांचा शोध घेत आहेत.
एपस्टिन फाईल्समध्ये मस्क–झुकरबर्ग यांचा फोटो
जगभर गाजत असलेल्या एपस्टिन फाईल्समध्ये टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा इलॉन मस्क आणि मेटाचे सीईओ मार्प झुकरबर्ग यांचा फोटो समोर आला आहे. या पह्टोमध्ये सिलिकाॅन व्हॅलीतील अनेक दिग्गज डिनर करताना एकत्र दिसले होते. यामध्ये सहसंस्थापक पीटर थील आणि एमआयटी मीडिया लॅबचे माजी संचालक जोई इतोदेखील दिसत आहेत. हा फोटो 2015 मधील आहे. या पार्टीला जेफ्री एपस्टिनने ‘वाईल्ड डिनर’ म्हटले होते.
छत्तीसगडच्या डीएसपी कल्पना वर्मा अखेर निलंबित
छत्तीसगडमधील दंतेवाडाच्या डीएसपी कल्पना वर्मा यांना राज्य सरकारने अखेर सेवेतून निलंबित केले आहे. एका हॉटेल व्यापाऱ्याला प्रेमप्रकरणात फसवून त्यांच्याकडून कोटय़वधी रुपये उकळल्याचा कल्पना वर्मा यांच्यावर आरोप आहेत. रायपूरचे प्रसिद्ध हॉटेल व्यापारी दीपक टंडन यांनी कल्पना वर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. वर्मा यांनी प्रेमाचे जाळे टाकून आपल्याकडून अडीच कोटी रुपये उकळले होते. याशिवाय महागडी कार, हिऱ्याची अंगठी, सोन्याचे दागिने घेतले आहे असा आरोप होता.

























































