हे करून पहा – कांदा चिरताना रडू येते….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदा चिरताना डोळे जळजळतात, डोळ्यांतून पाणी येते. यावर तुम्ही काही स्मार्ट उपाय करू शकता. कांदा चिरण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यामुळे त्यातील वायू हवेत लवकर पसरत नाही. डोळ्यांची जळजळ कमी होते.

कांद्याचे दोन भाग करून ते काही वेळ थंड किंवा साध्या पाण्यात ठेवा. कांदा चिरण्यासाठी नेहमी धारदार सुरी वापरा. कांद्याच्या मुळाशी असलेला पांढरा भाग काढून टाका. कांदा चिरताना खिडकीजवळ किंवा पंख्याखाली बसा.