
भ्रष्टाचारावर लक्ष ठेवणाऱया ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेने करप्शन परसेप्शन्स इंडेक्स 2025 (सीपीआय) जारी केला आहे. 182 देशांच्या यादीत हिंदुस्थान 91 व्या स्थानावर आहे. यापूर्वी हिंदुस्थानचा 96 वा क्रमांक होता. त्यामध्ये हिंदुस्थानचे रँकिंग काही प्रमाणात सुधारले आहे. म्हणजे हिंदुस्थानातील भ्रष्टाचार काही अंशी कमी झाला आहे. मात्र तरीही पत्रकारांची सुरक्षा आणि भ्रष्टाचारविरोधातील रिपार्ंटगसंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत हिंदुस्थानची स्थिती थोडी चांगली आहे. करप्शन परसेप्शन्स इंडेक्समध्ये 2024 साली हिंदुस्थान 96 व्या स्थानावर होता. तो आता 91 व्या स्थानावर पोचला आहे.
डेन्मार्क 89 गुणांसह सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश ठरला आहे. त्याखालोखाल फिनलँड आणि सिंगापूर आहे. अमेरिका 29 व्या तर ब्रिटन 20 व्या स्थानी आहे. दक्षिण सूदान आणि सोमालिया हे सर्वाधिक भ्रष्टाचारी देश आहेत. त्यांचा भ्रष्टाचारात पहिला क्रमांक आहे.
ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या संस्थेने भ्रष्टाचाराचे रिपार्ंटग करणाऱया पत्रकारांच्या जिवाला धोका, या श्रेणीत हिंदुस्थानला ठेवले आहे.
























































