निवृत्त महिला बँक अधिकाऱ्याची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बँकेची बनावट नावाची एपिके फाईल पाठवून ठगाने निवृत्त बँक अधिकारी महिलेची 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार या एका सरकारी बँकेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. गेल्या आठवडय़ात त्यांना एका नंबरवरून फोन आला. त्यांना सर्व पेन्शनधारकांना एक कार्ड दिले जात आहे. त्या कार्डवरून औषध खरेदी व इतर खरेदीसाठी वापरल्यास 20 टक्के नफा मिळेल असे सांगण्यात आले. त्यांना व्हॉट्सऍपवर एक एपिके फाईल पाठवून ती डाऊन लोड करण्यास सांगितली. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी ती फाईल डाऊन लोड केली. त्या फोनवर बोलत असताना त्यांच्या बँक खात्यातून पैसे गेल्याचे मेसेज आले. हा प्रकार त्यांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.