
महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर वाराणसीचे काशी विश्वनाथ मंदिर हे भक्तांसाठी सलग 27 तास खुले राहणार आहे. भक्तांना दर्शन घेता यावे यासाठी मंदिर प्रशासनाने या सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे काशी विश्वनाथ मंदिरात यंदा सर्व रेकॉर्ड मोडणार असे दिसत आहे.
15 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. या दिवशी पहाटे 2 वाजून 15 मिनिटांनी बाबा विश्वनाथ यांची पहिली मंगला आरती सुरू होईल. ही आरती सव्वा तीनला संपल्यानंतर साडे तीन वाजता मंदिराचे दरवाजे सर्वसामान्य भक्तांसाठी उघडले जातील. दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारीपर्यंत सकाळी साडेसहा वाजेपर्यंत भक्तांना विनाखंड बाबांचे दर्शन घेता येतील. मंदिराच्या परंपरेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी नेहमीच्या सप्तर्षी आरती आणि शयन आरती होणार नाहीत. त्याऐवजी महाशिवरात्रीला चार प्रहरची विशेष आरती केल्या जातील.




























































