
अॅपलच्या आयफोनला हिंदुस्थानात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कंपनीने हिंदुस्थानवर जास्त फोकस केला आहे. अॅपल कंपनी आता आपले सहावे स्टोअर 26 फेब्रुवारीला मुंबईतील बोरिवलीत उघडणार आहे.
मुंबईतील हे अॅपलचे तिसरे स्टोअर असणार आहे. याआधी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) आणि घाटकोपरमधील आरसीटी मॉलमध्ये स्टोअर्स उघडली आहेत. बोरिवरील तिसरे अॅपल स्टोअर उघडल्याने वेस्टर्न मार्गावरील ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे होईल.
बोरिवलीतील अॅपल स्टोअरमध्ये अॅपलचे सर्व लेटेस्ट प्रोडक्ट्ससह आयफोन सीरिजमधील फोन, मॅकबुक, आयपॅड, अॅपल वॉच खरेदीसाठी उपलब्ध असतील. या ठिकाणी ‘जीनियस बार’ची सुविधादेखील असेल, जिथे एक्सपर्टस् ग्राहकांच्या तांत्रिक समस्या जागेवरच सोडवतील. याव्यतिरिक्त, ग्राहक येथे ट्रेड-इन प्रोग्रामद्वारे आपले जुने फोन बदलून नवीन आयफोन घेऊ शकतील.































































