मोदींचा पत्ता ‘सेवातीर्थ’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘सेवातीर्थ’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा पत्ता असणार आहे. मोदींच्या हस्ते या नव्या वास्तूचे आज उद्घाटन करण्यात आले. पीएमओ, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय या इमारतीत असणार आहे.

रायसीना हिलवरील साऊथ ब्लॉकमधून पीएमओ आज सेवातीर्थ संकुलात हलवण्यात आले. तिथून आता मोदींचा कारभार चालणार आहे. ‘सेवातीर्थ नागरिकदेवो भव’ असे ठळक नाव इमारतीला दिले आहे. यानिमित्त टपाल तिकीट आणि नाणेदेखील जारी करण्यात आले.

साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉकमध्ये अनेक धोरणे आखण्यात आली. परंतु या इमारती ब्रिटिश राजवटीचे प्रतीक होत्या. या मानसिकतेपासून दूर जाणे आवश्यक होते. त्यासाठीच सेवातीर्थची उभारणी झाली आहे, असे मोदी म्हणाले. साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक अशा जुन्या इमारती पाडण्याऐवजी तिथे इतिहासाची माहिती देणारे संग्रहालय उभारले जाईल, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, पंतप्रधान कार्यालय 1947 पासून साऊथ ब्लॉकमध्ये आहे. 78 वर्षे ही इमारत सत्ताकेंद्र राहिली.