
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात असतानाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यानुसार, अजित पवार यांचे विमान बारामतीमधील गोजुबाबी येथे कोसळल्यानंतर त्याला आग लागली. या आगीत विमान जळत असताना त्यात जोरदार स्फोट झाला. आसपासचे गावकरी विमानाभोवती जमलेले असतानाच हा स्फोट झाला. थरकाप उडवणारा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
































































