
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना मांडवी शाखा क्र. 224 आणि जायंट्स ग्रुप ऑफ भायखळा यांच्यातर्फे मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच हाडांची तपासणी शिबीर आयोजित केले होते. शिवसेना उपनेते, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शिबिराचे उद्घाटन केले.
याप्रसंगी माजी शाखाप्रमुख हेमंत कोळी, महिला उपविभाग संघटिका विजयश्री साखरे, युवासेनेचे गुलाब उगरेज, जायंट्स ग्रुप ऑफ भायखळा फाऊंडेशनचे नसीमा स्लेटवाला, हुसेनी स्लेटवाला, जुल्फीकार अरसीवाला, हसन लोखंडवाला, दीपक चव्हाण, प्रमोद भेंडे, जगन्नाथ मोरे, अनिल गोटुगडे, शिवाजी जाधव, प्रेषित साबळे, करण कोळी, संदीप सपकाळ, चेतन दुराफे, संदीप वरळीकर, सुभाष दाभाडे, श्रवण सुंबरे व इतर पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. शिबिरात 184 नागरिक सहभागी झाले. 54 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शाखाप्रमुख स्वप्नील कोळी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
























































