4 मार्चला सर्वात स्वस्त आयफोन येतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अॅपल कंपनी 2026 मध्ये एक जोरदार धमाका करण्याच्या तयारीत आहे. अॅपल येत्या 4 मार्च रोजी आतापर्यंतचा सर्वात स्वस्त मॅकबुक, नवीन बजेट आयफोन 17 ई आणि नवीन आयपॅड लाँच करणार आहे. अॅपलचा हा इव्हेंट 4 मार्च रोजी न्यूयॉर्कला होणार असून हिंदुस्थानी वेळेनुसार, या कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. अॅपल कंपनी पहिल्यांदाच नव्या मॅकबुकमध्ये एम सीरिजऐवजी आयफोनमध्ये वापरली जाणारी ए सीरिज देण्याची शक्यता आहे. या मॅकबुकची किंमत केवळ 70 ते 80 हजारांपर्यंत असू शकते. कंपनीने या इव्हेंटचे निमंत्रण पाठवायला सुरुवात केली आहे. मॅकबुकसोबत कंपनी आयफोन 17 ई लाँच करणार आहे. या फोनची किंमत हिंदुस्थानात 60 हजार रुपयांपर्यंत असू शकते. या कार्यक्रमात आयपॅडदेखील लाँच केला जाईल.