
साडी खरेदी करताना सिल्कच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होते. म्हणून काही टिप्स लक्षात ठेवा. सिल्कची साडी ही नेहमी वजनाने हलकी असते. साडीच्या काही भागाचा गोळा करा. त्यावर बारीक सुरकत्या दिसल्या म्हणजे ते खरे सिल्क.
सिल्क साडीचा पदर मागच्या आणि पुढच्या बाजूने सारखाच दिसतो. साडी दोन्ही हातांनी पकडा. त्यानंतर त्या साडीचे दोन भाग 3 ते 5 सेकंद एकमेकांवर घासा. घासलेल्या ठिकाणी साडी थोडी उबदार लागली तर ते अस्सल सिल्क असते.
























































