
मनी लॉण्डरिंग प्रकरणात होत असलेल्या आरोप निश्चितीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी दाखल केली आहे.
सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या गुह्यावर विशेष न्यायालयाने प्रथम सुनावणी घ्यावी, असे अनिल देशमुख यांचे म्हणणे आहे. न्या. अश्विन भोबे यांच्या एकल पीठासमोर यावर सुनावणी झाली. न्यायालयाने ईडीला याचे उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. यावरील पुढील सुनावणी 5 मार्चला होणार आहे.
शंभर कोटींचा आरोप
अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझसह अन्य अधिकाऱयांना बार मालकांकडून 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्याची दखल घेत उच्च न्यायालयाने याच्या प्राथमिक चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार सीबीआयने याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर ईडीने याचा स्वतंत्र गुन्हा दाखल केला.
Money Laundering Case: Anil Deshmukh Moves HC to Stay Framing of Charges
Former Minister Anil Deshmukh requests Bombay High Court to stay the framing of charges in the ED’s money laundering case until the CBI case is heard.
























































