
नोकरी बदलल्यानंतर अनेक नोकरदारांचे सॅलरी बँक अकाऊंट बदलते. हे बदललेले बँक खाते ईपीएफओ म्हणजे पीएफच्या खात्यावर अपडेट करणे आवश्यक आहे.
जुने सॅलरी अकाऊंट सुरू नसल्यास पीएफचे पैसे काढताना मोठी अडचण निर्माण होऊ शकते. ‘यूएएन’शी जोडलेल्या बँक खात्यातच पीएफची रक्कम येते.
ईपीएफओच्या ई-सेवा पोर्टलवर लॉग इन करून तुमचा यूएएन सध्या कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे, ते तपासा. आधार व्हेरिफिकेशन पूर्ण आहे का, हे तपासा.
आधार, पॅन आणि बँक तपशीलांमध्ये नावाची स्पेलिंगसुद्धा जुळली पाहिजे. अगदी छोटी चूक असली तरी अपडेट नाकारले जाऊ शकते. माहिती दुरुस्त करा.
ईपीएफओ पोर्टलवर लॉग इन करून ‘मॅनेज’ सेक्शनमध्ये जाऊन ‘केवायसी’वर क्लिक करा. सध्याचे बँक तपशील दिसतील. नवीन बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड टाका.




























































