
बॉलीवूडचे प्रख्यात पटकथालेखक सलीम खान यांना सौम्य ब्रेन हॅमरेज झाला असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रपृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
90 वर्षीय सलीम खान यांना मंगळवारी लीलावती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. कुटुंबीयांच्या विनंतीवरून रुग्ण, कुटुंबीयांची गोपनीयता सांभाळून बुधवारी सलीम खान यांच्या प्रकृतीची विस्तृत माहिती देण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर आज डॉक्टरांनी सलीम खान यांच्या प्रपृतीविषयी माहिती दिली. लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर जलील पारकर म्हणाले, ‘‘सलीम खान यांना मिनिमल ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर डीएसए (डिजिटल सबट्रैक्शन एंजियोग्राफी) करण्यात आली आहे. सर्जरी करण्याची गरज भासली नाही. पण ते अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. पृपया त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याच्या चुकीच्या बातम्या पसरवू नका.’’ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम खान यांची प्रपृती सध्या स्थिर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. त्यांच्या वाढत्या वयाचा विचार करता, त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

























































