
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिका-हिंदुस्थान व्यापार करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्ला चढवला आहे. व्यापार करारातील लाजीरवाण्या शरणागतीमागे पंतप्रधान मोदींच्या गळ्यापर्यंत आलेला दबाव आहे, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला पाच सवाल केले आहेत.
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये व्हिडिओही शेअर केला आहे. त्यात एपस्टीन फाइल्स आणि हरदीप सिंग पुरी, मोदी आणि ट्रम्प यांना उद्देशून अनिल अंबानी आणि जेफ्री एपस्टीन यांच्यामधील चॅट, अमेरिकेतील अदानींवर खटला आणि माजी लष्करप्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख राहुल गांधी व्हिडिओत केला.
व्यापार समझौते पर संसद में अपने भाषण में मैंने Jiu-Jitsu का उदाहरण क्यों इस्तेमाल किया?
अमेरिकियों को खुश करने के लिए हमारे किसानों की कुर्बानी क्यों दी गई?
अमेरिका को हमारे तेल आयात तय करने देकर भारत की ऊर्जा सुरक्षा से समझौता क्यों किया गया?
बिना किसी पारस्परिक वादे के, हर… https://t.co/N3DS9BIEuU
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 20, 2026
अमेरिकेला खुश करण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांची कुर्बानी का दिली गेली? अमेरिकेला आपली तेल आयात ठरवण्याची सूत्रे देऊन हिंदुस्थानच्या ऊर्जा सुरक्षेशी तडजोड का केली गेली? कोणत्याही परस्पर आश्वासनांशिवाय, दरवर्षी अमेरिकेची आयात १०० अब्ज डॉलर्सने वाढवण्याचे मान्य का केले? हा करार हिंदुस्थानला डेटा कॉलनी बनवू शकतो? ज्या करारात हिंदुस्थान खूप काही देत आहे आणि त्या बदल्यात खूप कमी मिळत आहे, अशा कराराला मोदी का सहमत होतील? या लाजीरवाण्या शरणागतीचे उत्तर पंतप्रधानांच्या गळ्यापर्यंत आलेला दबाव आहे, असे राहुल गांधी म्हणाले.


























































