Jalana News- जालन्यात चालत्या कारला भीषण आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालन्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी एक थरारक घटना घडली. चालत्या कारला अचानक भीषण आग लागल्याने गाडी जळून खाक झाली आहे. मात्र, कारमधील चारही प्रवाशांनी वेळीच प्रसंगावधान राखून वेळीच कारच्या बाहेर आल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

नेमकी घटना काय?

शुक्रवारी 20 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार (MH-11 BD 6081) बीडकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होती. वडीगोद्री येथील उड्डाणपुलावर गाडी आली असता, अचानक कारच्या एसीमधून (AC) धूर निघू लागल्याचे चालकाच्या लक्षात आले.

कारमधून धूर येत असल्याचे दिसताच चालकाने क्षणाचाही विलंब न लावता गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. कारमधील चारही प्रवासी तातडीने खाली उतरले. ते खाली उतरताच अवघ्या पाच मिनिटांत आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण कार आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाली.यावेळी स्थानिकांनी कारला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगेची तीव्रता अधिक असल्याने कार जळून खाक झाली.