लवकरच नौदलात येतेय आयएनएस ‘अरिधमन’, तिसरी आण्विक पाणबुडी, 3 हजार किलोमीटरवरील शत्रूंचा वेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या समुद्री ताकदीला बळ मिळणार आहे. येत्या एप्रिल ते मे दरम्यान तिसरी अणुऊर्जेवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आयएनएस ‘अरिधमन’ पाणबुडी नौदलाच्या सेवेत दाखल व्हायला सज्ज होत आहे. ‘अरिधमन’ची शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी ही पाणबुडी लवकरच कार्यान्वित होणार असल्याची घोषणा केली.

‘आयएनएस अरिधमन’ला विशाखापट्टणम येथील जहाज बांधणी सेंटरमध्ये अॅडव्हान्स टेलॉजी वेसेल (एटीव्ही) प्रोजेक्ट अंतर्गत बनवण्यात आले आहे. ही पाणबुडी ‘आयएनएस अरिहंत’ आणि ‘आयएनएस अरिघात’पेक्षा मोठी आहे. तिचे वजन सात हजार टन आहे. ‘आयएनएस अरिधमन’ आता अंतिम सागरी चाचण्यांच्या टप्प्यावर आहे. सिस्टम वॅलिडेशन आणि शस्त्र एकीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित परीक्षण पूर्ण झाले तर ही पाणबुडी औपचारिकरीत्या नौदलाला सुपूर्द केली जाईल.

  • ‘आयएनएस अरिधमन’ पाणबुडीत आठ उभ्या लाँच सिस्टम टय़ूब आहेत. आधीच्या आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघाटमध्ये 4 सिस्टम टय़ूब होत्या.
  • अरिधमन पाणबुडीवर ‘के-15 सागरिका’ (750 किमी रेंज) 24 क्षेपणास्त्रे असतील.
  • ‘के-4’ ची 8 क्षेपणास्रे (रेंज 3,500 किमी)
  • के-4 क्षेपणास्त्राची रेंज आशियातील बहुतांश भागात पोहोचण्यास सक्षम आहे.
  • ही पाणबुडी हिंदुस्थानच्या सेकंड स्ट्राईक क्षमतेला मजबूत करेल.
  • पाणबुडीमुळे नौदलाला पहिल्यांदाच समुद्रात तीन कार्यरत अरिहंत-श्रेणीच्या पाणबुड्या मिळतील.
  • पाणबुडीत अंदाजे 70 टक्के स्वदेशी साहित्य आहे, ज्याच्या बांधकामात एलअँडटी आणि टाटा पॉवरसारख्या हिंदुस्थानी कंपन्या आहेत.