
साखळीतच बाद झालेल्या ऑस्ट्रेलियाने ओमानचे 105 धावांचे आव्हान अवघ्या 9.4 षटकांत एका फलंदाजाच्या मोबदल्यातच गाठत टी-20 वर्ल्ड कपचा आपला प्रवास मोठय़ा विजयासह संपवला. अॅडम झम्पाने 4 तर झेव्हियर बार्लेट, ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेत ओमानचा डाव 104 धावांत संपवला तर हे लक्ष्य त्यांनी कर्णधार मिशेल मार्शच्या 4 षटकार आणि 7 चौकारांसह साकारलेल्या 64 धावांच्या खेळीसह गाठले. त्याने ट्रॅव्हिस हेडसह 81 धावांची सलामीही दिली.





























































