छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर होणार चकाचक; शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे दर सोमवारी डीप क्लिनिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर चकाचक होणार असून दर सोमवारी या परिसरात मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डीप क्लिनिंग मोहीम राबविण्यात येणार आहे.

नुकतीच शिवाजी पार्क जिमखाना येथे विभागप्रमुख-आमदार महेश सावंत व नगरसेविका विशाखा राऊत यांच्या उपस्थितीत नागरिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागरिकांनी मैदान व परिसरात नियमित स्वच्छता (डीप क्लिनिंग) व्हावी, अशी मागणी केली. नागरिकांच्या सूचनेनुसार आणि शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने आता दर सोमवारी मैदान परिसरात डीप क्लिनिंग मोहीम राबविण्यात येणार आहे.

तथापि, सफाई काम सुरळीत व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. मैदानालगतच्या रस्त्यावर गाडय़ा पार्क न करता समोरील बाजूस किंवा पर्यायी जागेत पार्क कराव्यात. जेणेकरून परिसर अधिक स्वच्छ, सुंदर व सुशोभित राहण्यास मोठी मदत होईल, असे आवाहन शाखाप्रमुख अजित कदम यांनी केले आहे.