कर्तृत्ववान महिला, युवतींचा होणार गौरव; स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्कारासाठी आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक महिला दिनानिमित्त परळ येथील सुभाष डामरे मित्र मंडळातर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱया मुंबईमधील कर्तृत्ववान महिलांचा स्व. माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदाही  14 मार्च रोजी समाजातील कर्तृत्ववान युवती आणि महिलांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

सुभाष डामरे मित्र मंडळाचे संस्थापक आनंद गावकर व संचालक – शिवसेना सचिव सुधीर साळवी, आमदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्कार सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. पुरस्कारासाठी इच्छुक युवती व महिलांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जामध्ये नाव, पह्टो, पत्ता, ई-मेल, मोबाईल नंबर, कार्य करीत असलेले क्षेत्र, वैशिष्टय़पूर्ण कामगिरी, एपूण वर्षे, मिळालेल्या शाबासकीबद्दलची प्रमाणपत्रे आणि शिफारस पत्रे जोडून आपला अर्ज रविवार, 8 मार्चपर्यंत दाखल करावा. अधिक माहितीसाठी नाना फाटक, संतोष कांबळी, प्रभाकर मोरजकर, रुपेश कोचरेकर, अभिषेक गवाणकर (9819301959 / 9619188989/ 9930912255) यांच्याशी संपर्प साधावा. या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका उर्मिला पांचाळ, श्वेता जामदास, मयूरी परब, सुवर्णा गुराम, नीलाक्षी चेंदवणकर, नीलम मिरगळ व विद्या राबडीया यांनी केले आहे.