
पाथर्डी तालुक्यातील मढी येथील यात्रेत यंदाही मुस्लिम व्यावसायिकांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय मढी ग्रामपंचायतीने घेतला आहे. या निर्णयामुळे मुस्लिम व्यावसायिक अस्वस्थ झाले आहेत.
मढी यात्रेमध्ये रेवडी, दवना, स्टेशनरी, कटलरी, खेळणी विकणारे अनेक मुस्लिम व्यावसायिक असून, शेकडो वर्षांपासून हे व्यावसायिक या यात्रेत व्यवसाय करीत आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना दुकाने लावू न देण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसायबंदी करण्यात आली. आता यंदा मढी देवस्थानमध्ये नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात आले असून, हे मंडळ आपल्याला दुकाने लावू देतील, अशी अपेक्षा मुस्लिम व्यावसायिकांना आहे. मात्र, मढी ग्रामपंचायतीने ठराव केल्याने मुस्लिम व्यावसायिकांनमध्ये अस्वस्थता आहे.



























































