
मालाड पूर्वेकडील रहेजा कॉम्प्लेक्सजवळचे नुतनीपृत शहीद विजय साळसकर उद्यान अखेर आज खुले झाले. विभागातील लोकांच्या आग्रहास्तव दिंडोशीचे शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी या उद्यानाचे लोकार्पण केले.
दिंडोशी विभागातील वॉर्ड क्रमांक 36, मालाड पूर्व, रहेजा कॉम्प्लेक्स येथील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण असलेल्या साळसकर उद्यानाची अवस्था फारशी चांगली नव्हती. उद्यानात मार्ंनग वॉकसाठी आणि लहान मुलांना खेळण्याची व्यवस्था नव्हती. ही बाब लक्षात घेऊन सुनील प्रभू यांनी उद्यानाच्या नूतनीकरणासाठी प्रयत्न सुरू केले. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात या उद्यानासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन 29 एप्रिल 2025 रोजी उद्यानाचे काम सुरू झाले. नूतनीकरण झाल्यानंतर आता उद्यान लोकांसाठी उपलब्ध झाले आहे.
उद्घाटनप्रसंगी उपविभागप्रमुख सुधीर गुजर, माजी नगरसेविका रीना सुर्वे, उप विधानसभा संघटिका रुचिता आरोस्कर, उपशाखाप्रमुख अल्पेश चव्हाण, उपविभाग समन्वयक पृष्णकांत सुर्वे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
या सुविधा मिळणार!
n लहान मुलांसाठी रॉक क्लायम्बिंग. n ओपन जिमची सुविधा. n लोकांना चालण्यासाठी पथ वे (वॉकिंग ट्रक). n ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था. n ह्यूईंग गॅलरी.






























































