
खर्डीत रेल्वे फाटकातील रस्त्यावर रूळ टाकल्यानंतर फक्त खडी टाकून फाटक सुरू करण्यात आले. रस्त्यावर डांबर किंवा सिमेंट न टाकल्यामुळे रेल्वे पटरीवरून जाताना वाहने अडकून पडत आहेत. फाटकातील रस्ता उखडल्याने अपघाताचा धोका वाढला असून ट्रॅकवरून धक्का मारून वाहनांना बाहेर काढावे लागत आहे. रोजच असे प्रकार घडत असूनही रेल्वे प्रशासन ढिम्म असल्याने संताप व्यक्त होत आहे.
कल्याण – कसारामध्ये रेल्वेची तिसरी लाइन टाकण्याचे काम जोरात सुरू असल्याने खर्डी स्थानकाजवळील रेल्वे फाटक जवळपास महिनाभर बंद ठेवण्यात आले होते. महिनाभरानंतर रेल्वे फाटक सुरू करण्यात आले. मात्र खर्डीत रेल्वे फाटकातील रस्त्यावर रूळ टाकल्यानंतर फक्त खडी टाकून फाटक सुरू करण्यात आले. फाटकातील रस्ता उखडल्याने अपघाताचा धोका वाढला असून ट्रॅकवरून धक्का मारून वाहनांना बाहेर काढावे लागत आहे. अनेक दुचाकीस्वारांना गाड्या काढताना वाहनचालकांची दमछाक होत असून रात्रीच्या वेळी तोल सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. ट्रॅकमध्ये अडकलेल्या वाहन अटकल्यास मदतीला कोणी नसल्यास अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
खर्डी-दळखण रेल्वे फाटकातील रस्त्याची गैरसोय दूर करण्यासाठी तिथे तत्काळ पेव्हर ब्लॉक लावण्यात येतील. येथील उड्डाणपुलाचे काम प्रस्तावित असून लवकरच मार्गी लागेल. – आर. एन. मैत्री, रेल्वे अधिकारी.



























































