पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, इस्रायली विरोधी पक्षनेत्याचा भाषणावर बहिष्काराचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित इस्रायल दौऱ्यापूर्वीच तिथे मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. इस्रायलमधील विरोधी पक्षनेते यायर लॅपिड यांनी पंतप्रधान मोदींच्या ‘नेसेट’मधील (इस्रायलची संसद) भाषणावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. इस्रायलच्या अंतर्गत राजकारणामुळे मोदींच्या या दौऱ्याला विरोधाचा सामना करावा लागत आहे.

पंतप्रधान मोदी आपल्या या दौऱ्यात इस्रायली संसदेला संबोधित करणार आहेत. मात्र विरोधी पक्षनेते यायर लॅपिड यांनी सत्ताधारी नेतन्याहू सरकारवर निशाणा साधत या भाषणात सहभागी न होण्याचे संकेत दिले आहेत. लॅपिड यांच्या मते, पंतप्रधान नेतन्याहू हे मोदींच्या या दौऱ्याचा वापर स्वतःची राजकीय प्रतिमा सुधारण्यासाठी आणि देशातील अंतर्गत प्रश्न दडपण्यासाठी करत आहेत. आम्ही हिंदुस्थानचे मित्र आहोत, पण या राजकीय तमाशाचा भाग बनणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.