
राजपाल यादव सुमारे १२ दिवस तिहार तुरुंगात होते. ५ फेब्रुवारीला त्यांनी आत्मसमर्पण केले, त्यानंतर त्याला न्यायालयाने १.५ कोटी रुपयांचा जामीन मंजूर केला. १७ फेब्रुवारीला त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले, त्यानंतर ते थेट त्याच्या गावी शाहजहांपूरला गेले. तिथे त्यांच्या भाचीचे लग्न होणार होते. तिथे राजपाल यांनी कुटुंबासोबत बराच वेळ घालवला होता. आता राजपाल देखील परत कामावर परतले आहेत. परंतु कामावर येताक्षणी ते पुन्हा भावुक झाले आहेत. कामावर परतल्याचा व्हिडीओ त्यांनी स्वतः सोशल माध्यमावर शेअर केला आहे. व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून राजपाल म्हणाले की ते देव आणि त्याच्या प्रियजनांमुळे कामावर परतले आहेत.
राजपालने सांगितले या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्या पहिल्या वहिल्या ब्रेकची आठवण सांगितली. १३ जुलै १९९७ साली त्यांना पहिल्यांदा अभिनय करण्याची संधी मिळाली. पुण्यात “स्वराज” नावाची मालिका चित्रित करण्यात आली होती. अभिनेत्याने पुढे सांगितले की मुंबई शहराने त्याला प्रत्येक आव्हानात साथ दिली. राजपाल म्हणाले की, हे प्रेम आणि विश्वास त्याला प्रचंड आत्मविश्वास आणि शक्ती देतो.
राजपाल यादव यांच्यावर असलेले कर्ज आता ९ कोटींवर पोहोचले आहे. त्यांच्या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ मार्चला होणार आहे.



























































