IND Vs SA – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव चाहत्यांच्या जिव्हारी लागला! आर. अश्विनही भडकला; दोन चूकांवर केलं भाष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ICC T20 World Cup 2026 मध्ये टीम इंडियाच्या विजयी रथाला सुपर 8 च्या पहिल्याच सामन्यात ब्रेक लागला. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा पराभव करत संघाला जबर धक्का दिला. या पराभवामुळे संघ निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. चाहत्यांमध्ये रोष असून माजी खेळाडूंनीही आता आपापली मत मांडत टीम इंडियाच्या प्लेइंग 11 संदर्भात भाष्य केलं आहे. रविचंद्रन अश्वननेही आपली नाराजी बोलून दाखवत संघ व्यवस्थापनाने घेतलेल्या दोन निर्णयांना पराभवाच कारण ठरवलं आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेकीचा कौल पार पडला आणि प्लेइंग 11 संदर्भात चाहत्यांची चर्चा सुरू झाली. टीम इंडियाचा उपकर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आलं नव्हत. त्याच्या जागी वॉशिंगटन सुंदरची निवड करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. हीच गोष्ट रविचंद्रन अश्विनलाही खटकली असून त्याने आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये सतत संघाचे कॉम्बिनेशन बदलने ही चांगली रणनीती नाही. IPL मध्ये हा प्रयोग यशस्वी ठरू शकतो, मात्र ICC सारख्या स्पर्धांमध्ये संघ स्थिर असणं जास्त गरजेचं असल्यात मत अश्विनने व्यक्त केलं.

अक्षर पटेल व्यतिरिक्त रिंकू सिंगच्या फलंदाजी क्रमवारीर त्याने बोट ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रिंकू सिंगला 8 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं तर वॉशिंग्टन सुंदरला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची जबाबदारी सोपवली होती. अश्विनच्या मते रिंकू सिंग सारख्या आक्रमक आणि मॅच विनर फलंदाजाला मधल्या फळीत किंवा वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं पाहिजे. संघात 8 फलंदाज असताना रिंकूला खालच्या क्रमांकावर पाठवणं एकप्रकारे चुकीच असल्याच अश्विन म्हणाला आहे. त्यामुळे अपुऱ्या तयारीमुळे मोठ्या सामन्यात उतरनं संघाला भारी पडू शकतं, ही शिकवण दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव संघाला देऊन गेल्याचंही तो म्हणाला आहे.