इस्रायलच्या संसदेत मोदींच्या भाषणावर बहिष्काराचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारपासून इस्रायलच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार असून त्याआधीच इस्रायलमध्ये अंतर्गत राजकारण पेटले आहे. सत्ताधाऱ्यांवर नाराज असलेल्या इस्रायलमधील विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर बहिष्काराची धमकी दिली आहे. दौऱ्यात मोदी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू व राष्ट्रपती आयसॅक हर्जोग यांना भेटणार आहेत. तसेच ते ‘नेसेट’ला (इस्रायली संसद) संबोधित करण्याची शक्यता आहे. त्यांच्या भाषणावेळी सरकारने इस्रायली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही नेसेटमध्ये निमंत्रित करावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.