
सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता डोंगरी कारागृहात सावरकरांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात येणार आहे. अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे 15 सप्टेंबर 1910 ते 30 जानेवारी 1911पर्यंत डोंगरी कारागृहात वास्तव्य होते. या आठवणींना उजाळा देण्यासाठी व त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या प्रतिमेचे अनावरण होणार आहे. या वेळी सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र साठे, मुंबई महापालिका सभागृह नेते गणेश खणकर, उपमहापौर संजय घाडी आदी उपस्थित राहतील.





























































