अनंत गर्जेना सत्र न्यायालयाकडून जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी व त्यांचे पती अनंत गर्जे यांचा मुंबई सत्र न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटीने आरोपपत्र दाखल केले असून तपास पूर्ण झाल्याने आरोपीच्या कोठडीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे बहीण शीतल गर्जे-आंधळे व भाऊ अजय गर्जे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.