बंगळुरूमध्ये ऍमेझॉनचे 12 मजली ऑफिस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऍमेझॉनने बंगळुरूमध्ये आशियातील दुसरे सर्वात मोठे कार्यालय उघडले आहे. हे कार्यालय 12 मजली असून तब्बल 11 लाख स्क्वेअर फुटांमध्ये पसरलेले आहे. या कार्यालयात अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी ऑपरेशन्स, पेमेंट्स, टेक्नॉलॉजी आणि सेलर सर्व्हिसेस यांसारख्या विभागांचे 7,000 हून अधिक कर्मचारी एकाच वेळी काम करू शकतील. ऍमेझॉनचे हे ऑफिस जवळपास पाच एकरांमध्ये बांधले आहे.