हलगर्जी कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी ‘ठोको विधेयक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधान भवनातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आमदारांच्या कपात सूचना वर्षानुवर्षे तशाच पडून आहेत. त्यांची उत्तरेच मिळत नाहीत. भाजप नेते व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी 16 मार्च 2022 रोजी कपात सूचना मांडली, त्याचे उत्तर 18 फेब्रुवारी 2026 रोजी आले, अशी माहिती आज विधानसभेत दिली. ही परिस्थिती सुधारायची असेल तर निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यासाठी ठोको विधेयक 2026 मंजूर करा असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला. दरम्यान, विधानसभेसंदर्भातील सर्व कामकाजासाठी डिजिटल यंत्रणा उभारण्याची कार्यवाही सुरू आहे. ती लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत 1937 ते 2025 पर्यंतचे संपूर्ण रेकॉर्ड डिजिटलाईज झाले आहे असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.