
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून विधान परिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात जाहीर केली. तालिका सभापती म्हणून चित्रा वाघ, कृपाल तुमाने, विक्रम काळे, राजेश राठोड आणि सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.































































