
विम्याचा दावा मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्यासाठी 25 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. कांबळे यांच्या वतीने लाच घेणाऱ्या अभिजीत प्रकाश सुर्वे याला एसीबीने ताब्यात घेतले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर अपघाती मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबीयांना विम्याचा दावा मिळवण्यासाठी आरटीओ तपासणी अहवाल आणि डीएआर फॉर्म हवे होते. ते मिळवून देण्यासाठी कांबळे यांनी 25 हजारांची मागणी केली. तडजोडीनंतर 15 हजार रुपये देण्याचे ठरले. हे पैसे घेण्यासाठी अभिजीत शिर्पे या त्रयस्थ व्यक्तीला पाठवण्यात आले.






























































