
अजित पवार हे प्रवास करत असलेले व्हीएसआर कंपनीचे लिअरजेट 45 विमान कोसळले आणि त्यात पवार यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या कंपनीवर अखेर डीजीसीएने पहिली कारवाई केली आहे. कंपनीकडे लिअरजेट श्रेणीतील 7 विमाने असून त्यापैकी 4 विमानांची उड्डाणे रोखण्यात आली आहेत. सुरक्षेसंदर्भात अनेक त्रुटी आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.































































