
मंत्रालयात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातच 35 हजारांची लाच घेताना पकडला गेलेला लिपिक राजू ढेरेंगे याला निलंबित करण्यात आले आहे. अधिवेशनात या लाचखोरीचे पडसाद उमटणार असल्याचे लक्षात घेत ही कारवाई करण्यात आली. झिरवळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांना या प्रकरणात आधीच कार्यमुक्त करण्यात आले आहे. मेडिकलवरील कारवाई मागे घेण्यासाठी लाच मागण्यात आली होती. दरम्यान, एसीबीच्या विशेष न्यायालयाने ढेरेंगेला जामीन मंजूर केला आहे.

































































