
परळ येथील (समर्थ गृहनिर्माण संस्था) शापूरजी पालनजी वसाहतीतील रहिवाशांचे नव्या घराचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. या वसाहतीचा पुनर्विकास प्रस्ताव लवकरच मार्गी लागणार आहे. त्यासाठी शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत व आमदार अजय चौधरी यांनी आज अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजयपुमार मोहंती यांची भेट घेतली. या भेटीत शापूरजी पालनजी वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळाने पुनर्विकासाच्या प्रक्रियेला गती देण्याची मागणी केली. त्यावर, केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार या वसाहतीच्या पुनर्विकास प्रस्तावाला लवकरात लवकर अंतिम मंजुरी देण्याचे आश्वासन मोहंती यांनी दिले. या बैठकीला गृहनिर्माण संस्थेचे प्रकाश सौंदाळकर, संदीप सावंत, रमेश रजपूत उपस्थित होते.
Parel’s Shapoorji Pallonji Colony Redevelopment Project Nears Final Approval
Residents of Shapoorji Pallonji colony in Parel are set to get new homes as Shiv Sena leaders push for the final approval of the redevelopment proposal.






























































