
केरळ राज्याचे नाव बदलून ‘केरलम’ करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकार विकास प्रकल्पांकडे दुर्लक्ष करून केवळ नावे बदलण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोप थरूर यांनी केला आहे. मल्याळम भाषेत राज्याला आधीच ‘केरलम’ म्हटले जाते, मग इंग्रजीत नाव बदलून काय साध्य होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
थरूर यांनी माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारच्या धोरणांवर तावडी मारली. ते म्हणाले, ‘मल्याळममध्ये आम्ही नेहमीच ‘केरलम’ म्हणतो. आता फक्त एक मल्याळम शब्द इंग्रजीत आणला जात आहे. याने नेमका काय फरक पडणार आहे हे मला माहीत नाही. केंद्र सरकारने आम्हाला ‘एम्स’ (AIIMS) दिले नाही किंवा कोणतीही नवीन संस्था दिली नाही. केंद्रीय अर्थसंकल्पात केरळसाठी कोणतेही मोठे प्रकल्प नाहीत. मात्र, जेव्हा नाव बदलण्याची गोष्ट येते, तेव्हा सरकार लगेच परवानगी देते.’
‘केरलमाईट’ की ‘केरलमियन’? थरूर यांचा भाषिक चिमटा

इंग्रजीत प्रभुत्व असणारी व्यक्ती अशी ओळख असलेल्या शशी थरूर यांनी ‘X’ (ट्विटर) वर एक पोस्ट करत एक गमतीशीर पण तात्विक प्रश्नही उपस्थित केला. नाव बदलल्यानंतर आता इथल्या रहिवाशांना काय म्हणावे? असा प्रश्न त्यांनी विचारला. ‘केरलमच्या रहिवाशांसाठी आता कोणते शब्द वापरले जातील? ‘केरलमाईट’ (Keralamite) हा शब्द एखाद्या सूक्ष्मजंतू (Microbe) सारखा वाटतो, तर ‘केरलमियन’ (Keralamian) हा शब्द एखाद्या दुर्मिळ खनिजासारखा वाटतो’, असा टोला त्यांनी लगावला.
निवडणुकीच्या तोंडावर केंद्राचा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी केरळचे नाव ‘केरलम’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. केरळमध्ये मे महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी २०२४ मध्येच विधानसभेत राज्याचे नाव बदलण्याचा ठराव मंजूर केला होता. राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीतील सर्व भाषांमध्ये राज्याचे नाव ‘केरलम’ असावे, अशी मागणी त्यांनी केली होती.
shashi tharoor slams centre over kerala name change to keralam
congress mp shashi tharoor criticises bjp government for renaming kerala to keralam. says centre ignores projects but focuses on names. read updates on saamana.
saamana, daily saamana, samana, samna, shashi tharoor, kerala name change, keralam, pinarayi vijayan, kerala election 2026, central government



























































