अश्लील कंटेटच्या पाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अश्लिल कंटेट प्रकरणी मूडएक्सव्हीआयपी, कोयल प्लेप्रो, डिजी मूव्हीप्लेक्स, फील आणि जुगनू या पाच ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म (ओटीटी) वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. या प्लॅटफॉर्मवर अश्लिल आणि आक्षेपार्ह कंटेट दाखवला जात होता. आयटी कायदा 2020, आयटी नियम 2021, आयपीसी कलम 292 आणि महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवणे हे कायद्याचे उल्लंघन आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्र सरकारने उल्लू एएलटीटीसह 25 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. याआधी मार्च 2024 मध्ये अश्लिल कंटेटमुळे 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती.