मोगरा चांगला बहरावा म्हणून… हे करून पहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोगऱ्याचे रोप बहरावे म्हणून काही उपाय करता येतील. मातीतली बुरशी कमी करण्यासाठी आपण त्यात चमचाभर हळद घालू शकता. केळीची साले उन्हात सुकवा. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर करा. ती खत म्हणून कुंडीत घाला.

मोगऱ्याला फुले येण्यासाठी त्याला पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाशाची गरज असते. त्यासाठी रोपाला किमान 5 ते 6 तास सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी ठेवा. कुंडीत खते घातल्यानंतर त्याला थोडे थोडे पाणी घाला. माती कडक होऊ देऊ नका.