
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ‘लॉटरी अलॉटमेंट’ प्रक्रियेमधील गोंधळाची चौकशी करा, अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत लक्षवेधीद्वारे केली. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प लॉटरी अलॉटमेंट प्रक्रियेत फ्लॅट वाटपात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. काही रहिवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेत मोर्चे काढत आहेत, तर काही रहिवासी न्यायासाठी कोर्टात गेले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लॉटरी अलॉटमेंट’ प्रक्रियेतील गोंधळाची विशेष चौकशी करून हे का? कसे? व कुणामुळे झाले? याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करावी आणि ‘लॉटरी अलॉटमेंट’ प्रक्रियेत सुसूत्रता आणावी, अशी मागणी सुनील शिंदे यांनी केली.


























































