
चहाचा फक्त उल्लेख केला की, चहा प्रेमींचा चेहरा खुलतो. हिंदुस्थानात चहाप्रेमींची संख्या ही सर्वाधिक आहे. त्यामुळेच सकाळपासून ते अगदी रात्री झोपायच्या आधीही चहा पिणारे इथे पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहित आहे का, साखरेच्या चहाऐवजी गुळाचा चहा पिणे केवळ चविष्टच नाही तर आरोग्यदायी देखील आहे. गुळात अनेक पोषक घटक असतात. त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉलिक अॅसिड आणि लोह असे गुणधर्म असतात.
अधिक काळ निरोगी राहायचे असेल तर चहामध्ये गूळ घालायला सुरुवात करा. कारण गूळ खाणे हे रिफाइंड साखरेपेक्षा आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे. खरं तर, गूळ अशुद्ध असतो. जास्त साखरेचे सेवन केल्याने विविध समस्या उद्भवू शकतात. तुम्ही थोडीशी चहाची पाने, लवंग, दालचिनी, तुळस, आले आणि गूळ पाण्यात मिसळून चहा बनवू शकता. दुधाच्या चहामध्ये गूळ घालणे हा एक आरोग्यदायी पर्याय असू शकतो. गुळाच्या चहामध्ये लोह, फायबर, पोटॅशियम आणि इतर पोषक तत्वे भरपूर असतात. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि निरोगी पचनाला प्रोत्साहन देते.
जर तुम्ही वजन कमी करण्याचा आहार घेत असाल, तर तुम्ही साखरेच्या चहाऐवजी गुळाचा वापर करू शकता.
मासिक पाळी दरम्यान गुळाचा चहा पिल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो.
गुळाचा चहा पिल्याने मुरुमे टाळता येतात. आणि ब्लॅकहेड्सची समस्या कमी होते.
सर्दी, खोकला आणि फ्लू टाळण्यासाठी गुळाचा चहा पिणे अधिक हितकारक आहे.
कमकुवत प्रतिकारशक्ती मजबूत करायची असेल तर तुम्ही गुळाचा चहा सर्वात उत्तम पर्याय आहे.































































