लखनऊ हत्याकांडात मोठा ट्विस्ट, ‘या’ कारणातून मुलाने जन्मदात्याला संपवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात खळबळ माजवणाऱ्या लखनऊ हत्या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. नीट परिक्षेच्या कारणातून नाही तर पैसे गहाळ झाल्यावरून आणि दारु परवाना नूतनीवरून मुलाने बापाला संपवल्याचे तपासात समोर आलं आहे. आपल्यावर संशय येऊ नये म्हणून आरोपी मुलाने वडील बेपत्ता असल्याची तक्रार दिली. गुन्ह्यात कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याचा सहभाग असल्याचे त्याने नाकारले.

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या काही तास आधी आरोपी अक्षत प्रताप सिंग आणि वडील मानवेंद्र सिंग यांच्यात पैशांवरून वाद झाला. 19 फेब्रुवारी रोजी सिंग यांच्या घरातून 50 लाख रुपये गहाळ झाले होते. याबाबत अक्षतला विचारणा केली असता त्याने हे पैसे दारु परवाना नूतनीकरणासाठी दिल्याचे सांगितले. यावरून बाप-लेकात जोरदार भांडण झाले.

मानवेंद्र यांनी मुलाला मारहाण केल्याचे कळते. अखेर हा वाद विकोपाला गेला आणि मुलाने पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या वडिलांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह तिसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावरील खोलीत आणून मशिनद्वारे त्याचे तुकडे केले. हत्येनंतर पुढील दिवसात घरापासून 21 किमी अंतरावर सद्रौनाजवळ अवयवांची विल्हेवाट लावली. तर धड स्लिपिंग बॅगमध्ये भरून निळ्या ड्रममध्ये भरलं आणि 22 फेब्रुवारी रोजी, त्याची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असतानाच दारूच्या दुकानातील एक अकाउंटंट घरी आला आणि गुन्हा उघडकीस आला. पोलीस अधिक तपास करत आहेत.