
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयमुळे आगामी काळात अनेकांच्या नोकऱ्या जातील, अशी भीती अनेक क्षेत्रांतून वर्तवली जात आहे. यासंदर्भात मूडीजचा एक अहवाल समोर आला असून कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका आहे आणि कोणत्या नोकऱ्या सुरक्षित राहतील, यासंबंधी सांगितले आहे. क्लार्क, प्रशासकीय कामे, अध्यापनाच्या कामांमध्ये महिलांचे प्रमाण अन्य क्षेत्रांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे ही कामे एआय चांगल्या प्रकारे करू शकणार असल्याने एआयचा सर्वाधिक फटका महिलांना बसण्याची शक्यता वर्तवली आहे. नवीन पदवीधर, एन्ट्री लेवलचे कामे एआयमुळे मिळणे मुश्कील होतील, असा अंदाज असून अमेरिकेत तर हा ट्रेंड सुरू झाला आहे.
55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कर्मचाऱ्यांना नवीन टेक्नोलॉजी शिकणे कठीण होईल. नोकरी गेली तर या वयात त्यांना नवीन नोकरी मिळवणे अवघड होईल. श्रीमंत लोकांना एआयचा फायदा होईल. अनेक श्रीमंत व्यक्तीचे उत्पन्न गुंतवणुकीतून येते. एआयमुळे कंपन्यांच्या नफ्यात वाढ होऊन त्यांना फायदा होईल. 30 ते 50 या वयोगटातील कर्मचाऱ्यांकडे अनुभव आणि कौशल्य आहे. त्यामुळे एआयची त्यांना मदत होईल. एआय त्यांची जागा घेऊ शकणार नाही. एआयमुळे जगाची उत्पादक क्षमता वार्षिक सरासरी 1.5 टक्क्यांनी वाढेल. मात्र हा फायदा सर्वांना समान मिळणार नाही. श्रीमंत देश जास्त फायद्यात राहील. एआयमुळे महिला, युवक आणि अल्पशिक्षितांना फटका बसेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
न्यूज, ट्रव्हल आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांसाठी एआय हे मोठे आव्हान आहे. कारण चॅटजीपीटीसारखी टूल्स थेट ग्राहक व ब्रँडच्या मध्ये आली आहेत. आपला डेटा, ग्राहक संबंध मजबूत न करणाऱया पंपन्या पिछाडीवर जातील, अशी भीती बोस्टन कन्स्लटिंग ग्रुप बीसीजी आणि मोलोकोच्या अहवालात म्हटले आहे. श्रीमंत देशांमध्ये एआयमुळे 30 टक्के नोकऱ्या अधिक चांगल्या होतील. 30 टक्के नोकऱ्यांची जागा एआय घेईल.


























































