
रविवारपासून मार्च महिन्याला सुरुवात होत आहे. या महिन्यात विविध सणांची रेलचेल असल्याने बँकांसह विविध सरकारी आस्थापनांचे कामकाज सुट्टय़ांमुळे बंद राहणार आहे. मार्चमध्ये होळी, धुलिवंदन, गुढी पाडवा, रमजान ईद, राम नवमी असे सण आहेत. त्यामुळे या दिवशी देशातील विविध राज्यांमध्ये स्थानिक महत्त्वानुसार सुट्ट्या असणार आहेत. 11 दिवस बँकांचे कामकाज बंद राहील.
मार्च महिन्यात 1, 8, 15, 22 आणि 29 तारखेला मिळून एकूण 5 रविवार येत आहेत. त्यामुळे या तारखांना बँकांना सुट्टी असेल. त्याबरोबरच 14 आणि 28 मार्च रोजी दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. 3 मार्च रोजी महाराष्ट्रामध्ये धुलिवंदनानिमित्त बँकांना सुट्टी राहणार आहे, तर 19 मार्च रोजी गुढी पाडव्याला बँकांचे कामकाज बंद राहील. तसेच 21 मार्च रोजी रमजान ईदनिमित्त बँका बंद राहतील. 26 मार्च रोजी बँकांना रामनवमीची सुट्टी राहणार आहे.




























































